एमबीबीएस व बीई अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना होणार लाभ
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या एसएफसी अनुदानातून एमबीबीएस आणि बीई अभ्यासक्रम शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप देण्यात येणार आहे. या अंतर्गत आर्थिक मागासवर्गीय तसेच अनुसुचित जाती-जमाती आणि इतर विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ मिळणार आहे. मात्र याकरिता कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप, लॅपटॉप व विविध शैक्षणिक प्रशिक्षण देण्यात येते. कोरोनामुळे काही योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने याचा लाभ विद्यार्थ्यांना झाला नाही. महापालिकेच्यावतीने दरवषी शेकडो विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. मात्र महापालिकेला देखील निधी मंजूर झाला नसल्याने कोणत्याच योजना राबविण्यात आल्या नाहीत. महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱया योजनांचा लाभ कॅन्टोन्मेंट हद्दीतील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मिळत नाही. यापूर्वी कॅन्टोन्मेंटकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्याच योजना राबविण्यात येत नव्हत्या. पण कॅन्टोन्मेंट बोर्डला राज्यशासनाकडून मंजूर झालेल्या एसएफसी अनुदानातून लॅपटॉप देण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंटच्यावतीने विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच लॅपटॉप देण्यात येत आहे.
एसएफसी अनुदानांतर्गत हे लॅपटॉप देण्यात येणार असून याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. मागासवर्गीय, अनुसुचित जाती-जमाती आणि इतर विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ मिळणार आहे. केवळ एमबीबीएस आणि बीई हे अभ्यासक्रम घेणाऱया विद्यार्थ्यांना लॅपटॉप करिता अर्ज करता येणार आहे. तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवासी असणे बंधनकारक आहे. एमबीबीएस आणि बीई अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे अर्ज करावेत, असे आवाहन कॅन्टोन्मेंटच्यावतीने करण्यात आले आहे.