केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाव्हायरसपासून देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱयांना चांगली बातमी दिली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.
देशासमोर उद्भवलेल्या आर्थिक आणि करोनाच्या संकटावर मात करण्याबद्दल चर्चा झाली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली.