ऑनलाईन टीम / नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी आज नागपूरमधील एम्स रुग्णालयात कोरेनाची लस घेतली.
- कोरोना लस सुरक्षित : गडकरी
यावेळी नितीन गडकरी यांनी ‘कोरोना लस सुरक्षित आहे’, असे सांगून सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन देखील केले. ते म्हणाले, आपण सर्वांनी लस घेतली तर आपण कोविडमुक्त होऊ आणि या संकटातून आपल्या सर्वांना मुक्ती मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
नागपूरमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे याबद्दल काय सांगाल असे विचारले असता गडकरी म्हणाले, लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्वांनी न घाबरता लस घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालयात निःशुल्क लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या शिबिरामध्ये एक हजार लोकांना निःशुल्क कोरोना लस दिली जाणार आहे.