ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी स्वतः या बाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, काल रात्री उशिराने माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जे लोक मंगळवारी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सावध राहून काळजी घेतली पाहिजे. सध्या मी विलागिकरणात आहे. तसेच त्यांचा स्टाफ आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची देखील लवकरच कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी सरकार मधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत आदींना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी कोरोना ची लागण झाली. त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.