प्रतिनिधी /पुणे
केंद्रीय माहिती आयुक्त, ज्येष्ट पत्रकार-लेखक डॉ. उदय माहुरकर यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या पुणे विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन ‘लोकमान्य’च्या कार्याची प्रशंसा केली. प्रसिद्ध युवा लेखक चिरायू पंडित (बडोदा) हेही यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
‘लोकमान्य’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी डॉ. माहुरकर व पंडित यांचा सत्कार केला व ‘लोकमान्य सोसायटी’च्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी ‘लोकमान्य अर्थवार्ता’चे सल्लागार संपादक योगेश्वर गंधे, ‘लोकमान्य’चे पुणे सहा. विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे, सी. ए. रणजित नातू, विपणन प्रमुख आदित्य भेंडे आदी उपस्थित होते.