प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली. अंगडी यांनी ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट केले. राज्य तसेच देशातील बडय़ा नेत्यांच्या नंतर आता सुरेश अंगडी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आपली प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे. माझ्या सोबत असणाऱया व संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. कोरोना काळातही केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी नागरिकांमध्ये जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला होता.