ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने कोरोना लस विदेशातून आयात न करण्याचा आणि गरज पडल्यास तो निर्णय राज्य सरकारवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या या वृत्ताची दोन सरकारी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.
मोदी सरकार विदेशी लस आयात न करता देशातील लस उत्पादकांना प्रोत्साहित करणार आहे. त्यासाठी सरकारने या महिन्यात खासगी लस उत्पादकांना आगाऊ पैसेही दिले आहेत. दरम्यान, याच महिन्यात देशात संसर्गाचे रुग्ण वाढल्यानंतर मोदी सरकारने फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन आणि जॉन्सन या परदेशी कंपन्यांच्या लसीला भारतात विक्रीसाठी परवानगी दिली होती. मात्र, आता हा निर्णय केंद्राने राज्यांवर सोडला असल्याचे सांगण्यात येते.