क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया केआर शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धेचे शनिवार दि. 26 मार्च रोजी युनियन जिमखाना मैदानावर उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, राजू शेठ, अमान शेठ, मिहीर पोतदार, निशिल पोतदार, युनियन जिमखानाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, स्पर्धा सचिव प्रणय शेट्टी, पुनित शेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वा. या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार असून, चषकाचे अनावरणही होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 8 प्रँचायझी संघांनी भाग घेतला असून, एकूण 36 सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. साईराज वॉरियर्स, झेवियर गॅलरी डायमंड, साई स्पोर्ट्स, पोतदार ब्रदर्स, केआर शेट्टी किंग्ज, बीसीसी मच्छे, मेघा रायजिंग स्टार्स, विश्रुत स्ट्रायकर्स, हुबळी अर्जुन टायगर्स या संघांचा समावेश आहे.