क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित मार्च महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात होणाऱया केआर शेट्टी स्मृती चषक दुसऱया टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रुत स्ट्रायकर्सचे संघचालक चंदन कुंदरनाड हे तिसरे प्रँचायझी बनले आहेत.
बेळगावाती उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्पर्धा व खेळाडूंना मदत करण्यास नेहमी पुढाकार घेणारे पीपल्स ट्री को-ऑप. सोसायटीचे सीईओ चंदन कुंदरनाड यांनी बेळगावच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी बेळगावातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांना वाव देत आहेत. बेळगावातील क्रिकेटपटू उच्चस्तरावर खेळावेत, असा त्यांचा मानस असून मार्चमध्ये होणाऱया केआर शेट्टी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत आपला संघ दाखल केला आहे.
त्यामुळे केआर शेट्टी स्पर्धेत विश्रुत स्ट्रायकर्स हा तिसरा संघ आहे. स्पर्धेचे प्रमुख प्रणय शेट्टी यांच्या हस्ते चंदर कुंदरनाड यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नितिन चिकोर्डे, विकास देसाई, पुनीत शेट्टी व प्रशांत लायंदर आदी उपस्थित होते.