प्रतिनिधी /बेळगाव
केएलई व्ही. के. इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सच्यावतीने मौखिक आरोग्य दिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या पहिल्या महिला दंत तज्ञ डॉ. गीता कित्तूर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेतर्फे बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे मौखिक स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या विषयावर पथनाटय़ दंत चिकित्सा शिबिरे, शाळेमध्ये हेल्दी स्माईल स्पर्धेचे आयोजन, महाविद्यालयात पोस्टर व बॅनर्सचे प्रदर्शन यांचा समावेश आहे. आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांसाठी मौखिक आरोग्य सेवा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्राचार्या डॉ. अलका काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिल अंकोला यांच्या पुढाकाराने हे उपक्रम होत आहेत.