प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे आणि 2021-22 आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांवर चर्चा करणे या उद्देशाने केएलएस आयएमईआरने आयोजित केलेले चर्चासत्र नुकतेच पार पडले.
या चर्चासत्रात उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग होता. केएलएस आयएमईआरचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. डॉ. अतुल देशपांडे संचालक केएलएस आयएमईआर, डेल्टा एंटरप्राईजेसचे सीईओ अल्पेश जैन आणि चार्टर्ड अकौंटंट महेश तेनझिंग आणि सहसदस्य म्हणून केतकी प्रभू, विनय चौगुले, आशा नेवगी आणि अनुप्रिया बोकडे उपस्थित होते.
अतुल देशपांडे यांनी अर्थसंकल्पाच्या आर्थिक बाबींवर विचार व्यक्त करून विश्लेषण केले. अर्थसंकल्पातील त्रुटींवर त्यांनी प्रकाश टाकला. अल्पेश जैन यांनी अर्थसंकल्पाबाबत बाजारपेठेचा दृष्टिकोन स्पष्ट करून अर्थसंकल्पानंतरच्या गुंतवणुकीचे वातावरण कसे आहे, हे स्पष्ट केले. तेनझिंग ऍटो यांनी अर्थसंकल्पातील कर सुधारणा तसेच प्रतिकुल आणि आव्हानात्मक तरतुदी स्पष्ट केल्या. या मुद्दय़ांवर विद्यार्थी सदस्यांनी म्हणणे मांडले. चर्चेचे संयोजन डॉ. सुशांत जोशी व राहुल मेलकॉन्टॅक्टर यांनी केले. या चर्चासत्राला प्राध्यापक आणि केएलएस आयएमईआरचे विद्यार्थी उपस्थित होते.