बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) मंगळवारी बेंगळूर ते पणजी ही नवी सेवा १० सप्टेंबरपासून सुरू होईल असे जाहीर केले आहे.
के-एसआरटीसीचे जनसंपर्क अधिकारी टी. एस. लथा यांनी नॉन-ए / सी स्लीपर बस सेवा कर्नाटकची राजधानी बेंगळूर आणि गोव्याची राजधानी पणजी पर्यंत धावणार आहे. या बस चे तिकीट ९६० रुपये असणार आहे. बेंगळूरहून सायंकाळी ६. ३० ला निघालेली बस दुसर्या दिवशी सकाळी १०. १५ वाजता पणजीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ही बस पणजीहून सायंकाळी ५. ३० सुटेल आणि बेंगळूरला ती सकाळी ९. १५ वाजता पोहोचेल, असे म्हंटले आहे.