हत्तीचे मुखवटे घालून युवा महाराष्ट्र सेनेची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / इचलकरंजी
केरळ राज्यातील मल्लपुरम येथे फटाक्यानी भरलेले अननस हत्तीणीला खायला घालून तिची हत्या केली. याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करताना हत्तीच्या मुखवटे घालून युवा महाराष्ट्र सेनेच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात, मल्लपुरम गावातील काही नराधमांनी एका निष्पाप हत्तीणीला अननस मधून फटाके घातले. त्यामुळे हत्तीच्या तोंडात फटाके फुटल्याने तिचा जबडा स्फोटात तुटला. या वेदना सहनन झाल्याने ती एका नदीमध्ये जाऊन उभी राहिली. त्या पाण्यामध्ये गर्भवती असलेल्या हत्तीणीने आपला प्राण सोडला. दरम्यान, गर्भवती असल्याने हत्तीणीच्या पोटातील बाळाचा ही बळी गेला. त्यामुळे अशा दोन निष्पाप प्राण्यांचा जीव घेणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी संघटनेच्यावतीने हत्तीचा मुखुट व फलक घेऊन निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सॅम आठवले, कृष्णा जावीर, तोसिफ इनामदार, राहुल लोकरे, अभिजित कांबळे, कुमार दोडमनी, बसवराज टाकळग्गी, अभिजित घोडगीरे आदी उपस्थित होते.