प्रतिनिधी / शिराळा
गेल्या वर्षभरापासून केरोसीनचा पूरवठा बंद आहे. शिराळा तालुका डोंगरी असल्याने वारंवार वीज जाते, शिवाय वेळेवर गॅस ची टाकी मिळणं कठीण जाते. सामान्य माणसाला महिन्याला टाकी भरून घेणे परवडत नाही. ब-याचदा विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वाद होतात.
त्यामुळे पूर्वीप्रमाणे कोटा मिळावा. अशी मागणी तालुक्यातील केरोसीन विक्रेत्यांनी केली आहे. अत्यअल्प कमिशनवर काम करणे म्हणजे मशीपेक्षा रेडकू मोठं असा प्रकार झालाय. जर कोटा पूर्वीप्रमाणे मिळणार नसेल तर केरोसीन विक्रेत्यांना स्वस्त धान्य दुकान आणि गॅस वितरण या मध्ये सामावून घ्यावे. अशी मागणी तालुक्यातील केरोसीन विक्रेत्यांनी केली आहे. वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन दखल घेत नाही.
यामध्ये लक्ष घालून केरोसीन पूरवठा पुर्ववत करण्यासाठी आ. मानसिंग नाईक यांना निवेदन देण्यात आले. यशवंत पाटील , मणदूर .अरुण पाटील, वाडी भागाई. सुदाम कराळे ,रीळे पांडुरंग पाटील, वाकुर्डे खुर्द. राहुल वाघमारे ,कोकरूड आणि दत्तात्रय पाटील, कोकरूड, मारूती पाटील, तडवळे, बाजीराव पाटील, कापली, भिमराव पायमल,चिखलवाडी, गुणवंत बेंद्रे,शिवरवाडी हे परवानाधारक उपस्थित होते.