कस्टम विभागाची कारवाई, आरोपी गजाआड : 23 किलो गांजा हस्तगत
प्रतिनिधी / महाबळेश्वर
परदेशी नागरिकांनी वाईत फ्लॅटमध्ये ठेवलेल्या गांजावरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच जावली तालुक्यातील केळघर येथे फ्लॅटवर सीमा शुल्कच्या अधिकाऱयांनी धाड टाकत 23.631 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी केळघर येथील संतोष पांडुरंग पार्टे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱयांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार 17 रोजी सायंकाळी केळघर (ता. जावळी) येथील एका फार्म हाऊसवरती टाकलेल्या धाडीत 23.631 किलोग्रॅम गांजा अधिकाऱयांनी जप्त केला. या गांजाची सध्याची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष पांडुरंग पार्टे (रा. केळघर, ता. जावळी, जि.सातारा) याला अटक करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केळघर ता. जावळी येथील संतोष पांडुरंग पार्टे याच्या फार्महाऊसवर गांजाबात गोपनीय माहिती सीमा शुल्क अधिकाऱयांना प्राप्त झाली. या माहितीवरून पार्टे याच्या फार्महाउसवर बुधवारी सायंकाळी धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये एकूण 23.631 किलोग्रॅम गांजा जप्त केला असून या गांजाची सध्याची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष पांडुरंग पार्टे याला अटक केली. त्याला गुरुवारी सकाळी कस्टम विभागाने जावळी (मेढा) न्यायालयात हजर केले व न्यायमूर्ती एन. एस. काळे यांनी 31 मार्च पर्यंत सातारा येथे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. जे. आर. इंगळे यांनी काम पाहिले.
ही कारवाई पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या अखत्यारित दापोली कस्टम विभागाचे उपआयुक्त अमित नायक एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व जवान मधुकर भोईटे यांच्या देखरेखीखाली अधीक्षक महेश कुमार यादव यांच्यासह पथकातील निरीक्षक अमर बहादूर मौर्य, मनाली शिवप्रकाश कथले, विकास, मुकेश कुमार, हेड हवालदार एस. एम. आंबेकर, एस. एस. विलंकर, के. एल. ढेबे, व वी. के. कात्रट यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली.