प्रतिनिधी/ रत्नागिरी
पेटीएमला केवायसी सेवा अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेला 90 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े मंजिरी अरविंद घोलकर (46, ऱा आरोग्य मंदिर रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी मंजिरी यांच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करून तुमचे पेटीएम केवायसी अपडेट नसल्याचे सांगितल़े त्यासाठी मंजिरी यांना मोबाईलवर ऍप ओपन करायला लावून त्यांचे बॅंक डिटेलबाबत विचारणा केल़ी दरम्यान मंजिरी यांनी आपली माहिती सांगताच त्याच्या सारस्वत बँक खात्यातून 64 हजार व बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 23 हजार इतकी रक्कम काढण्यात आल़ी बँकेतून पैसे कमी झाल्यानंतर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आल्याचे मंजिरी यांच्या लक्षात आल़ी दरम्यान त्यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील हवालदार कोकरे करत आहेत़