प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीचे ज्ये÷ नेते आणि नवहिंद सोसायटीचे संस्थापक सदस्य, नवनिर्माण सोसायटीचे संस्थापक सदस्य कै. एल. आय. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन मराठा समाज सेवा मंडळ-वडगाव आणि नवनिर्माण मल्टिपर्पज सोसायटी व वधू-वर सूचन केंद्र यांच्यावतीने करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन डी. बी. पाटील होते. प्रारंभी कै. एल. आय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. अकस्मीत निधन झाल्याने सहकार क्षेत्राबरोबरच म. ए. समितीचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.
या शोकसभेत निवृत्त प्राचार्य एस. ए. पाटील, एम. आर. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, बी. एम. पाखरे, आर. डी. पाटील, व्ही. एन. चवरी यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेवून श्रध्दांजली वाहिली. या सभेला जी. एस. पाटील, एस. एच. पाटील, एन. एम. पाटील, बी. जी. देसाई, डी. के. पाटील, एन. एम. पाटील, अमित पाटील, रवळनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील, नारायण देसाई, वाय. एल. डोणकरी, शट्टूप्पा मंगणाकर, सुधीर देवसकर यांच्यासह माया नाईक, प्रियांका पाटील, विद्या पाटील आदी उपस्थित होते.