प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 2.45 वाजता करण्यात येणार आह़े व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पंतप्रधानांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाकडून देण्यात आली. नुकतेच कोकण रेल्वेमार्गाचे 100 टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होत़े त्याचे आता लोकार्पण होणार आह़े
रेल्वेमार्गाच्या लोकार्पण सोहळ्य़ानिमित्त रत्नागिरी हा रिमोट व्हेन्यू ठेवण्यात आला आह़े त्यामुळे प्रशासनाची लगबग दिसत आह़े पंतप्रधान मोदी हे बेंगळुर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झेंडा दाखवून मार्गाचा शुभारंभ करतील़ यासाठी रत्नागिरी मडगाव व उडपी रेल्वेस्टेशनवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह़े विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपुरक होऊन डिझेल इंजिनावरील इंधन खर्चात सुमारे वार्षिक सुमारे 150 कोटीची बचत होण्यास मदत होणार आहे. नवनवीन सुविधा व अत्याधुनिक यंत्रणेचा आधार घेत या रेल्वेचा प्रवास गतिमान करण्यावर भर दिला गेला आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याची उद्दिष्टपूर्ती युध्दपातळीवर झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही या महामंडळाला शाबासकी मिळाल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा आयुक्तांकडून 22 व 24 मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली होती. कोकण रेल्वेने 2015 मध्ये विद्युतीकरणाच्या कामाची कार्यवाही हाती घेतली. या कामाला 2016 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणावर सुमारे 1287 कोटींचा खर्च झाला आहे. त्या विद्युतीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले आहे. रत्नागिरी ते रोहा या मार्गावर त्यासाठी विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
रत्नागिरी ते रोहादरम्यान 4 विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात गेले आहे. माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी येथे ट्रक्शन उपकेंद्रे तर यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही 4 उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रोहा ते ठोकूरपर्यंत 740 किलोमीटर परिसरात संपूर्ण रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरणाचे काम आहे.