प्लास्टिक कचऱयाची माहिती न दिल्याने कारवाई
मुंबई
उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱया कंपन्यांपैकी एक असणाऱया कोक, पेप्सी आणि बिस्लेरी यांच्यावर जवळपास 72 कोटी रुपयांचा भक्कम स्वरुपाचा दंड सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) यांनी लावला आहे. सदरची दंड आकारणी ही प्लास्टिक कचऱयाची विल्हेवाट आणि संकलन यासंदर्भातील माहिती सरकारला न दिल्यामुळे करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर कंपन्यांवर दंड आकारणी करत असताना यामध्ये बिस्लेरीवर 10.75 कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला 8.7 कोटी आणि कोकाकोला बेव्हरेजवर 50.66 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर 1 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. अन्य एका कंपनीवर 85.9 लाख कोटी रुपयांचा दंड लावलेला आहे.
सीपीसीबी यांच्याकडून या सर्व कंपन्यांना 15 दिवसांमध्ये रक्कम जमा करण्याची माहिती दिली आहे. प्लास्टिक कचऱयाच्या प्रकरणामध्ये एक्सटेंडेड प्रोडय़ूसर रिस्पाँसिबिलिटी (इपीआर) एक पॉलिसी असून याच्याआधारे प्लास्टिकची निर्मिती करणाऱया कंपन्यांवर त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घ्यावयाची असते. बिस्लेरीचा प्लास्टिकचा कचरा हा जवळपास 21 हजार 500 टन राहिला आहे. पेप्सीजवळ 11,194 टन प्लास्टिक कचरा आहे. कोकाकोलाजवळ 4,417 टन प्लास्टिक कचरा साठलेला होता.