पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त : आंतरराज्य एस. टी. सेवा सुरळीत : आशा कार्यकर्त्यांकडून प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग
वार्ताहर / कोगनोळी
नजीकच्या महाराष्ट्र आणि केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार सतर्क झाले असून विविध खात्याचे अधिकारी कोगनोळी टोलनाका व महामार्गावर कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी काहीकाळ कर्नाटक-महाराष्ट्र एस. टी. बससेवा बंद केली होती. दोन तासानंतर पुन्हा आंतरराज्य मार्गावरील एस. टी. बससेवा पूर्ववत सुरळीत करण्यात आली.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया प्रवाशांमुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्मयता असल्याने महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना आरटी-पीसीआर हे निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सीमा तपासणी नाक्मयावरील अधिकारी व कर्मचाऱयांना दिल्या आहेत. त्यामुळे 72 तासाच्या आतील निगेटिव्ह अहवाल वाहनधारकांकडे नसल्यास प्रमाणपत्र नसणाऱया वाहनधारकांना परत पाठविण्यात येत आहे.
आज दिवसभरामध्ये चिकोडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम मुजावर, डॉ. आर. के. नाईक यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे जाणाऱया प्रवाशांना थर्मल स्क्रिनिंग करून सोडण्यात येत आहे. तसेच वरि÷ पोलीस अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांची कसून चौकशी करून त्यांना कर्नाटकात प्रवेश देण्यात येत आहे. योग्य कागदपत्रे नसल्यास त्यांना परत पाठविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये व कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये जाणारी ट्रक व मालवाहू वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या एस. टी. बस कर्नाटकात तर कर्नाटकातील एस. टी. बस राष्ट्रीय महामार्गावरुन सुरळीतपणे धावत आहेत.
मात्र निपाणी व्हाया कोगनोळी-कागल ही गावातून धावणारी बससेवा आज कोगनोळी येथील एस. टी स्टॅन्ड सर्कलमधून कागलला पुढे न जाता पुन्हा निपाणीकडे परतली आहे. तर कागल आगाराची कोगनोळी व्हाया हंचिनाळ व सुळकुड या गावाला जाणारी एस. टी. बस सेवा सुरळीत सुरू आहे. एकंदरीत या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे नागरिकांची जीवनशैलीच बदलून गेली असल्याचे चित्र कोगनोळी येथील टोलनाका व महामार्गावरील परिस्थितीवरुन दिसून येत आहे.
संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर तपासनाका
संकेश्वर : वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रवेश करणाऱया प्रवाशी व वाहनांची तपासणी करण्यासाठी संकेश्वर-गडहिंग्लज या मार्गावर तपासनाका सुरू करण्यात आला आहे. मंगळवारपासून येथे कडक तपासणी केली जात असून ट्रक, बस, दुचाकी व अन्य वाहने थांबवून त्यांचे क्रमांक, कोठे जाणार याची माहिती घेत प्रवाशी वर्गाची थर्मल स्क्रीनिंग तपासणी केली जात आहे.
तालुका वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची, शिवाजी कुराडे, वाय. बी. इलेगार यांच्यासह एएसआय आर. जी. पाटील व पोलीस कर्मचारी पथक केंद्रात ठाण मांडून बसले आहेत. याठिकाणी 800 हून अधिक लोकांना तपासून 210 वाहनांची कसून चौकशी केली आहे. दरम्यान तापासारखी लक्षणे दिसल्याने 7 नागरिकांना या मार्गावरुन परत पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाहन चालकांना कोविड प्रमाणपत्र अनिवार्य असून ते सोबत ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.