दारू पाटर्य़ा, सामाजिक अंतर , फेसमास्क नियमांचे उल्लघन : बुडण्याच्या घटना, तरीही दारूपाटर्य़ा सर्रास
प्रतिनिधी / फोंडा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही काही बिगरगोमंतकीय कोडार-खांडेपार येथील निर्जन स्थळावरील नदीच्या पात्रात सहलीचा आनंद कोणतेही सामाजिक अंतर न पाळता दारूच्या पाटर्यासह घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. सुट्टिच्या दिवसानी या स्थळावर कायम गर्दीचा माहोल असून नदीकाठावर बियर व दारूच्या बाटल्याचा खच पडलेला आहे. दारू सेवनानंतर नदीच्या पात्रात बुडण्याच्या अनेक नोंदी असूनही लोक सर्रास दारू सेवनासह पाण्य़ात बुडून आनंद घेण्याचे प्रकार कमी होताना दिसत नाही.
मागील चार दिवसापुर्वी कोडार नदीच्या पात्रात सहलीसाठी आलेल्या चार आयटी तंत्रज्ञापैकी एकटा दरीत बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. सहलीसाठी या स्थळावर मिळेल त्या वाटेने, आडमार्गाने अनेकजण दाखल होतात. सहलीसाठी जवळच असलेल्या एका फार्मातूनही एन्ट्री आहे. मात्र बुडण्य़ाच्या काही घटना घडल्यानंतर फार्मचालक हात वर काढतात याकामी त्यांना पोलिसांचेही सहाय्य मिळत असते. पोलीसांना गेटवरील नोंदीवरून सर्व माहिती हस्तगत करता येते मात्र मुद्दामहून असे प्रकार डावलण्यात येतात. सुरक्षितेचे उपायावर कोणाला पडलेले नाही. दारूच्या बाटल्यासह सर्रास पाण्यात मौजमजा सुरू असते. नदीत आघोंळ करत असताना नशेच्या भरात बुडतात, यावेळी त्याच्याबरोबर असलेले मंडळी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत नाहीत कारण सर्वाना आपली सुरक्षितता बाळगायची असते, जीव वाचवायचा असतो. बुडालेल्या कुटूंबियांनाच ती कळ सोसावी लागत असते.
हल्ली नदीच्या पात्र गाठण्यासाठी गावालागूनच असलेल्या बंधाऱयावरही मागील काही दिवसापासून सहलीसाठी गर्दी वाढू लागल्याने येथील स्थानिकांनी भिती व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱयावर कारवाई व्हावी अशी माण्गी जोर धरू लागली आहे.