एकाच कुटुंबातील दोघी तरूणीच्या मृत्यूने हळहळ
वारणानगर / प्रतिनिधी
अस्वस्थ वाटल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या आरती भगवान महापुरे(वय २५) हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूंची मृत्यूची बातमी समजताच त्याचा जबरदस्त धक्का बसून भाची मारिया अविनाश महापुरे (वय १९) हिचा जागीच मृत्यू झाला. कोडोली ता. पन्हाळा येथील महापुरे गल्लीत एकाच कुटुंबातील दोघींच्या असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोडोली गावातून हळहळ व्यक्त होत आहे. हि घटना मंगळवार दि. १ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आरती महापुरे ही डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करत होती ती मंगळवारी रात्री आठ वाजता कामावरून घरी आली असता तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कोडोली येथील तीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. हि माहिती भगवान यांनी आपल्या घरातील लोकांना सांगितले यावेळी या बातमीचा मारिया हिला जबरदस्त धक्का बसून ती जमिनीवर कोसळल्याने तिला उपचारासाठी तातडीने कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरती व मारीया या एकत्र कुटुंबात राहत होत्या. मारिया महापुरे त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ तर आरती महापुरे तिच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अशा या दुर्दैवी मृत्यूमुळे कोडोली गावातून हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.