वारणानगर / प्रतिनिधी
चावडीभाग, कोडोली ता. पन्हाळा येथील सुरज दत्तात्रय माळी वय ३८ या तरूणाने राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर सिलिंगच्या हुकाला दोरी लावून गळफास लावून आत्महत्या केली.
सुरज यांने आत्महत्या केल्याचे आज शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी निदर्शनास आलेवर चुलत भाऊ संजय माळी यानी कोडोली पोलीसात वर्दी नोंदवली आहे. सूरज हा दारुचा अति व्यसनी होता तसेच तो अविवाहीत होता अधिक तपास सहा. फौजदार शेडगें करीत आहेत.