वारणानगर / प्रतिनिधी
कोरोना प्रादूर्भावाचा संसर्ग रोखण्यासाठी कोडोली ता. पन्हाळा येथील बंद केलेला आठवडा बाजार तब्बल आठ महिन्यानी आज दि. २९ रोजी गुरुवारी पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने व्यापारी वर्गासह नागरिकात समाधान पसरले आहे.
कोडोलीच्या आठवडा बाजारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवार दि. २८ रोजी परवानगी दिल्यावर आज तब्बल बत्तीस आठवड्याने आठवडा बाजार भरला. कोडोली आसपासच्या खेड्यातील नागरिकांची मुख्य मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत परिसरातील गांवातून व शेजारच्या जिल्ह्यातील गांवातून शेतकरी नागरिक आपला माल विकायला आणतात ही बाजारपेठ असल्याने शेतकरी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बाजारपेठत आठवडा बाजार बंद राहिल्याने कोडोलीतील व्यापारी वर्गाचे तसेच दैनदिन भाजीपाला घेवून विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आज पुन्हा बाजार सुरू झाल्याने नागरिकांच्यात व व्यापऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खूप दिवसांनी कोडोली बाजारपेठेत माणसांची व व्ययापाऱ्यांची लगबग दिसून अली.
पन्हाळा पूर्व भागात कोडोलीत प्रत्येक गुरुवारी आठवडा बाजार मोठया प्रमाणात भरतो. परिसरातील शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी येत असतात. तसेच परिसरात नोकरदार व व्यापारी वर्ग मोठा असलेने धान्य भाजीपाला खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्गही मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे कोरोना सारखा व्हायरस झपाट्याने पसरू शकतो या रोगाला प्रतिबंध करणेसाठी मार्च पासून जिल्हाधिकारी यांनी आठवडा बाजारास बंदी घातली होती. त्या बंदिस शिथिलता मिळताच गुरुवार दि.२९ रोजी पूर्वी प्रमाणे आठवडा बाजार सुरू झाल्याने गेली सात महिने बाजरपेठ फुलली दुपार पर्यंत तुरळक गर्दी दिसून येत होती परंतु सायंकाळ नंतर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजार पेठत लगबग दिसत होती.