पेडणे / प्रतिनिधी
कोनाडीचे माजी पंचसदस्य मनोहर नवसो आंबेकर (वय 66) यांचे अल्प आजाराने मंगळवारी सायंकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. बुधवारी कोनाडी येथील स्थानिक स्मशानभूमित दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात्य पत्नी, दोन मुलगे, स्नुषा तसेच दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे, भाऊ, भावजया असा परिवार आहे.