बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची ८,६४२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह, संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 2,49,590 वर पोहोचली आहे. यापैकी १,६४,१५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८१,०९७ रुग्ण उपचार घेत आहेत तर कोरोनामुळे आतापर्यंत ४,३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बुधवारी जणांचा १२६ मृत्य झाला आहे. बुधवारी ७,२०१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आयसीयूमध्ये ७०४ रुग्ण दाखल आहेत.
राज्यात एकूण ६३,०८५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३०,३९९ जलद प्रतिजैविक चाचणी आणि ३२,६८६ आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. बुधवारी एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण २१,९७,२५९ जणांनी तपासणी केली आहे.
८,६४२ नवीन रूग्णांपैकी २८०४ रुग्ण एकट्या बेंगळूर शहरात सापडले आहेत. एकूण ९६,९१० रुग्णांपैकी ३३,२८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि ६२,०४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५६ रुग्णांचा मृत्यू बुधवारी झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यानंतर शिमोगा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९९५ नवीन रूग्ण आढळले आहेत. एकूण ५,३५१ रुग्णांपैकी २,४४७ रूग्णांवर उपचार सुरू असून ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.