- मागील 24 तासात 14,317 नवे कोरोना रुग्ण; 57 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 14 हजार 317 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 66 हजार 374 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 667 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 1,508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 06 हजार 400 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 06 हजार 070 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.34 % तर मृत्युदर 2.52 इतका आहे.
- मुंबईत 1,508 नवे रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 1,508 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 911 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,38,631 वर पोहचली आहे. तर 3,14,257 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,515 इतकी आहे. सद्य स्थितीत 11 हजार 969 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.