ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसचे जगभरात थैमान सुरूच असून, मागच्या 24 तासांत जगभरात 1861 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनमधून फैलावलेल्या कोरानाने जवळपास 170 देशांना विळखा घेतला असून, चीननंतर इटली, स्पेन, इराण यांसह अनेक देशांत त्याने हाहाकार उडवून दिला आहे. महासत्ता अमेरिकेलाही या आजाराची झळ बसल्याचे दिसत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत या आजाराने 3200 वर, तर इटलीत सर्वाधिक 6 हजार हून अधिक जणांना या महामारीत आपले प्राण गमवावे लागले आहेत. फ्रान्स 860, एऊ इराणमध्ये 1800, तर स्पेन 2300, इंग्लंडमध्ये 335 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासांत इटलीमध्ये 475 जणांचा मृत्यू झाला. जगातील 12,300 जणांची प्रकृती गंभीर आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 499 वर पोहोचला असून, 10 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 24 जण यातून बरे झाले आहेत. जगातील 1 लाख 2 हजार जण आजतागायत कोरोनामुक्त झाले आहेत.