पोलीस आयुक्तांचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त के. त्यागराजन् यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. 14 ते 18 जुलैपर्यंत पाच दिवस दरवर्षाप्रमाणे ही यात्रा होणार होती.
एका बेळगाव शहरात 138 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 37 हून अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. अशा परिस्थिती यात्रा भरविल्यास सामाजिक अंतर राखणे कठीण होणार आहे. याबरोबरच गोवा व महाराष्ट्रातून येणाऱया भाविकांचीही मोठय़ा प्रमाणात गैर सोय होणार आहे. त्यामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवषी मोठय़ा प्रमाणात श्री मंगाई देवीची यात्रा भरते. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ज्या परिसरात यात्रा भरते. या परिसरात सॅनिटायझेशन करणेही कठीण जाणार आहे. या पार्श्वभूमिवर यंदाची यात्रा रद्द करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी काढला आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करतानाच या आदेशाचे उल्लंघन केल्यास सीआरपीसी कलम 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.