प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा उदेक झाला असून एकूण रुग्णसंख्या 1 लाख ओलांडली आहे. सोमवारी दिवसभरात 5,324 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची दिवसभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्यात आतापर्यंत 1,01,465 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 37,685 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 1,953 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 8 जणांनी आत्महत्या केली आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 61,819 इतकी आहे.
कोरोनाचा संसर्ग असणाऱया देशातील राज्यांच्या यादीत कर्नाटक चौथ्या स्थानावर आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात 5,324 बाधितांची भर पडली. तर 1,847 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. 75 बाधितांचा मृत्यू झला आहे. राज्यात उपचार घेणाऱया रुग्णांपैकी 598 जण आयसीयुमध्ये आहेत.
बेंगळूरमध्ये सर्वाधिक 46,923 रुग्ण
बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णसंख्या 46,923 वर पोहोचली आहे. त्यापैकी 12,189 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 917 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील उपचारातील रुग्णांचा आकडा 33,816 इतका आहे.
मागील चोवीस तासांत बेंगळूर शहर जिल्हय़ात 1,470, बळ्ळारीत 840, गुलबर्ग्यात 631, म्हैसूर 296, उडुपी 225, धारवाड 193, बेळगाव 155, कोलार 142, बेंगळूर ग्रामीण 138, रायचूर 120, मंगळूर 119, विजापूर व दावणगेरेत प्रत्येकी 110, तुमकूर 89, शिमोगा 76, हासन 66, यादगीर 64, गदग 63, रामनगर 62, मंडय़ा 56, चित्रदुर्ग 51, बिदर 42, चिक्कबळ्ळापूर 40, कारवार 32, कोप्पळ 28, बागलकोट व हावेरीमध्ये प्रत्येकी 27, चिक्कमंगळूर 26, चामराजनगर 16 तसेच कोडगू जिल्हय़ात कोरोनाचे 10 नवे रुग्ण सापडले आहेत.