प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील यामागे जे कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी सर्व साखळ्या रोखण्यात यश आले आहे. वाई तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच गेल्या दोन दिवसात पाच जण नव्याने रूग्ण आढळून आले आहेत. बावधननजीक असलेल्या वाघजाईवाडीचा एक जण सोलापूरला विवाह सोहळ्याला गेला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर कडेगावचा बाधित हा निकट सहवासी आहे. पसरणीचा बाधित पुण्यावरून आला आहे. पुण्यावरून आलेल्या सह्याद्रीनगरमध्ये एक बाधित आहे. वाई तालुक्यातील बाधितांचा आकडा हा 75 वर गेला आहे.
वाई तालुक्यात गत महिन्यात 21 पासून जोर घरला होता. बाहेरून आलेल्यामुळे या आकड्यात होतेय वाढ. त्यात जांभळी खोरे, पसरणी, देगाव, दह्याट, आसरे, आसले या गावाचा समावेश होता. मात्र, वाईच्या प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन प्रशासन करत असताना ही हेकेखोर वृत्तीमुळे कोरोना पुन्हा वाई तालुक्यातील व्याजवाडी, शेलारवाडीमध्ये वाढल्याचे वाई तालुकवासीयांनी अनुभवले. वाई तालुका कोरोनामुक्त होत असताना दुसऱ्या बाजूला गेल्या दोन दिवसात पुन्हा पाच नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये बावधननजीक असलेल्या वाघजाईवाडी येथील 57 वर्षाचा पुरुष हा घरातल्या विवाह सोहळ्यानिमित्त सोलापूर येथे दि. 16रोजी गेला होता. तो दि. 22रोजी परत आला. परत आल्यानंतर त्यास थोडासा त्रास जाणवू लागताच वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याचे स्वाब घेण्यात आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यामुळे बावधन गाव सुद्धा हबकले आहे. त्याचे बाजारपेठ एका ठिकाणी मोटर दुरुस्तीचे दुकान असल्याचे समजते.त्यामुळे बावधन येथे काही भाग सील करण्यात आला असून तहसीलदार रणजित भोसले हे सोमवारी भेट देणार आहेत. त्या बाधिताच्या सहवासात आलेले कोरोनटाइन करण्यात आले आहेत.
कडेगाव येथील 34 वर्षीय युवक हा बाधित रुग्णाच्या निकट सहवासात होता. तसेच सह्याद्रीनगर येथील 30 वर्षीय बाधित युवकाच्या घरात पुण्यावरून पाहुणे आले आहेत.त्या पाहुण्यांचे ही स्वाब घेण्यात येणार आहेत.तर पसरणीचा 48 वर्षीय बाधित पुणे येथुन आला आहे.वाई तालुक्यातील सर्व साखळ्या तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे.मात्र, प्रशासन किती जरी प्रयत्न करत असले तरी ग्रामस्थांच्या नियम मोडण्याच्या वृत्तीमुळे पुन्हा गावात कोरोना येत आहे.
वाई तालुका बाधित 75
मुक्त 61
मृत 5
दि.27
वाई तालुक्यातील कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,
डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये
वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 9 वर्षीय बालिका.
दि.28
वाई सह्याद्रीनगर येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.