सातारा / प्रतिनिधी
एकीकडे पावसाचा जोर अन दुसरीकडे कोरोनाबाधितांची वाढती अशा संकटात जिल्हय़ात मृत्युदर वाढतच असून सोमवारी देखील 7 बाधितांचा मृत्यू झाल्याने आता एकूण बळींची संख्या 250 च्या घरात पोहोचली आहे. कराड हॉटस्पॉट ठरलेला असतानाच आता सातारा शहर व तालुका तालुका हॉटस्पॉट झाला असून रविवारी रात्रीच्या अहवालात साताऱयात तब्बल 70 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात एकाच दिवसात 48 जणांचे अहवाल बाधित आले असून त्यापैकी एकटय़ा गोगवे गावात 27 बाधित असून तिथे संसर्ग साखळी तयार झाली आहे. तर कोरोना बाधित असलेल्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे. दरम्यान सोमवारी जिल्हय़ातील 283 एवढय़ा जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकली असून त्यामुळे कोरोनामुक्तांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडत जिल्हय़ाला दिलासा दिला आहे. तर नंतर आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 290 नागरिकांचा अहवाल बाधित आला आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्हय़ातील 222 जणांचा अहवाल बाधित आला असून या सर्वांवर लक्षणांनुसार उपचार सुरु आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
जिल्ह्यातील 283 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 28, कराड तालुक्यातील 73, खंडाळा तालुक्यातील 28, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 5, माण तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 18, सातारा तालुक्यातील 52, वाई तालुक्यातील 35 असे एकूण 283 नागरिकांचा समावेश आहे.
कराड तालुक्यात कोरोनामुक्तीचे ८ वे शतक
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 808 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक 38 वर्षीय महिला, कालवडे 38 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली 51 वर्षीय पुरुष, मार्केट यार्ड कराड येथील 32 वर्षीय महिला, मलकापूर 21 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड 25 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, मलकापूर 75 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत 45 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड 55 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर 36 वर्षीय पुरुष, ओंडोशी 41 वर्षीय पुरुष, नागठाणे 48 वर्षीय पुरुष, वाटेगाव 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ कराड 25 वर्षीय पुरुष, खटाव 41 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, गोळेश्वर 60 वर्षीय महिला, काले 67 वर्षीय महिला, कार्वे 23 वर्षीय पुरुष, चोरे 28 व 25 वर्षीय पुरुष, मलकापूर 23 व 30 वर्षीय पुरुष व महिला, शनिवार पेठ कराड 37 वर्षीय महिला, मलकापूर 58 वर्षीय महिला, मार्केट यार्ड कराड 9 व 4 वर्षीय मुलगी, रविवार पेठ कराड 8 वर्षीय मुलगा, चोरे 10 वर्षीय मुलगी, वडोली बुद्रुक 49 वर्षीय महिला, टोप कोल्हापूर 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांची विचारपूस
सोमवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कृष्णा हॉस्पिटलला भेट देत तिथे उपचार घेत असलेल्या राज्याचे सहकारी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कारण नाही. मात्र त्यांना मधुमेह व रक्तदाबही असल्याने अधिक काळजी म्हणून त्यांना मंगळवारी मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सातारा केसरकर कॉलनी 70 वर्षीय पुरुष, कराड शनिवार पेठ 55 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड 70 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण 80 वर्षीय पुरुष, धामणी, ता. पाटण 55 वर्षीय पुरुष तसेच साताऱयातील खाजगी रुग्णालयात ओंड ता. कराड 79 वर्षीय पुरुष व पाटखळ ता. सातारा 66 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोरोना बाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेत कोरोनाचा पुन्हा शिरकाव
सातारा जिल्हा परिषदेत अर्थ विभागानंतर आता आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून आजारी असलेल्या आरोग्य सेवकाची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते दि. 12पासून कामावर आले नसल्याने सुटकेचा निश्वास टाकला असला तरीही त्यांच्या कोण कोण सहवासात आले त्यांची तपासणी होणार आहे. आरोग्य विभागतले अनेकजण सतत त्यांच्या संपर्कात आल्याची चर्चा दिवसभर सुरू असून ते घरीच उपचार घेत असल्याचे समजते.
रविवारी रात्रीच्या अहवालात 222 बाधित
सातारा तालुका 70 बाधित : सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, आकाशवाणी झोपडपट्टी 1, शाहूनगर 1, गुरुवार पेठ 9, सातारा 7, दुर्गापेठ 3, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, गुरुवार परज शनिवार पेठ 1, मल्हारपेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, जानाई कॉलनी 1, फडतरवाडी 2, खेड 2, गोखलेनगर 1, भादवडे 1, धनगरवाडी 1, भरतगाववाडी 1, पाटखळ 1, खोदड 1, पिरवाडी 1, नागठाणे 5, धावडशी 3, विकासनगर 9, कोडोली 1, गोडोली 1, संगमनगर 1, आरफळ 1, कण्हेर 1, समर्थनगर 1, अतित 1, ब्राम्हणवाडी (तासगाव) 1, चिंचणेर निंब 2.,
कराड तालुका 20 बाधित : कराड शहरातील आझाद चौक 1, कापील 2, रेठरे बुद्रुक 1, कराड 4, गोटे 1, मलकापूर 1, प्रकाशनगर 1, शिरवडे 1, होळ 2, बनपूरी 1, उंब्रज 1, जखीणवाडी 2, सैदापूर 1., फलटण तालुका 11 बाधित : फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 3, लोहारगल्ली 2, रविवार पेठ 1, मारवाड पेठ 1, निंभोरे 1, साखरवाडी 2, विडणी 1.,
महाबळेश्वर तालुका 48 बाधित : पाचगणी 5, गोगवे 27, नगरपालिका 8, डॉ. साबणे रोड 2, देवळी मुरा 3, तालदेव 4., कोरेगाव तालुका 11 बाधित : गोगावलेवाडी 1, आसनगाव 4, कोरेगाव 4, कुमठे 1, पिंपोड बुद्रुक 1., खटाव तालुका : तडवळे 1., तालुका : म्हसवड 1.,
वाई तालुका 12 बाधित : वाई शहरामध्ये रविवार पेठेतील न्हावी आळी 1, सुरुर 1, बेलमाची 3, जेधेवस्ती वारागडेवाडी भूईज 2, धर्मपुरी 1, कोंढवली 4., पाटण तालुका 20 बाधित : ढेबेवाडी 14, पाटण 2, धामणी 1, कडवे बुद्रूक 1, बनपूरी 1, मोरेवाडी-मालदन 1.,
जावळी तालुका 18 बाधित : मोरघर 8, मेढा 4, एरणकरवाडी 2, रिटकरवाडी 1, दापवडी 1., खंडाळा तालुका 12 बाधित : वडवाडी 3, पारगाव खंडाळा 2, शिरवळ 1, पाडळी 1, धावडवाडी 1, गोटमाळ लोणंद 2 पळशी 2 जणांचा समावेश आहे.
672 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 112, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगाव 50, वाई येथील 55, खंडाळा 62, रायगाव 30, मायणी येथील 45, महाबळेश्वर 100, पाटण येथील 7, दहिवडी 35 असे एकूण 672 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 36687
एकूण बाधित 7883
एकूण मुक्त 4223
एकूण बळी 249
उपचारार्थ रुग्ण 3411
सोमवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 290
एकूण मुक्त 283
एकूण बळी 07