ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आज बीएसएफच्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज पुन्हा 41 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 193 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील बहुतेक जवान पोलिसांसोबत कायदा सुव्यवस्थेसाठी ड्युटी बजावत होते. या जवानांमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, जे जवान कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संदर्भात जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन बीएसएफ द्वारे केले जात आहे.