संशोधनानंतर चिंतेत भर, काळजी आवश्यक, जागतिक रुग्णसंख्या 1,22,32,745 तर मृत्यू 5,54,304
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी, फुफ्फुसांचे विकार, न्युमोनिया इत्यादी आजार होऊ शकतात, असे आतापर्यंतच्या संशोधन दिसून आले आहे. तथापि, नव्या संशोधनानुसार कोरोनाचा विषाणू माणसाच्या मज्जासंस्थेवरही विपरित परिणाम करतो, असे स्पष्ट झाले आहे. यामुळे मज्जासंस्था तसेच मेंदूचे विविध विकार संभवू शकतात. स्मरणशक्तीचाही नाश होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचे मज्जासंस्थेवरील दुष्परिणाम बरे झालेल्या रुग्णांमध्येही दीर्घकाळ राहतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्णत: बरे झाल्याचे प्रमाणपत्र असणारे रुग्णही त्यांच्या पूर्ण क्षमतेने त्यापुढच्या काळात काम करू शकत नाहीत, असे आढळले आहे. या संशोधनामुळे या विषाणूच्या गंभीर परिणामांचे नवे पैलू समोर आले आहेत.
अतितीव्र लक्षणेही आढळली
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मज्जासंस्थेवर परिणाम झालेले 93 रुग्ण आढळून आले आहेत. चीनमधील वुहान येथेही 40 टक्के रुग्णांना मेंदूच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. मज्जासंस्थेच्या या विकारांची तीव्रता कमीअधिक प्रमाणात असू शकते. तथापि, काही रुग्णांमध्ये अतितीव्र लक्षणे आढळली आहेत. यामुळे स्मरणशक्ती हरविणे तसेच शरीराच्या इतर अवयवांवरील नियंत्रण सुटणे अशीही मोजकी प्रकरणे आढळली आहेत.
आणखी संशोधनाची आवश्यकता
कोरोना रुग्णांमध्ये आढळणारी मज्जासंस्थेवरील परिणामांची लक्षणे कोरोना या विषाणूमुळेच निर्माण झाली आहेत की त्यासाठी अन्य काही कारणे आहेत यावर अद्याप सखोल संशोधन झालेले नाही. ब्रिटन, अमेरिका व इतर देशांमध्ये यावर वेगाने संशोधन सुरू आहे. मात्र, कोरोनाबाधितांमध्ये मज्जासंस्था बाधितांचे प्रमाणही अधिक आढळत असल्यामुळे कोरोनाचा संबंध मज्जासंस्था अशक्त होण्याशी असावा, अशी दाट शंका संशोधकांना येत आहे.
जास्तीत जास्त काळजी घ्या
कोरोना विषाणूच्या लागणीचे नेमके कोणते परिणाम शरीरावर होतात, याविषयी अद्यापही नवी नवी माहिती मिळत आहे. यावरचे संशोधन पूर्णत्वाला गेलेले नाही. त्यामुळे जगभरातील जनतेने या विषाणूची लागण होऊच नये, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायवास हवेत. या विषाणूला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. बरे होणाऱया रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे, हे खरे असले तरी दुर्लक्ष होऊ देता कामा नये. कारण हा विषाणू शरीराचा कोणता भाग निकामी करेल आणि त्याचा परिणाम बरे झालेल्या रुग्णालाही कशाप्रकारे भोगावा लागेल, याविषयी निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. म्हणून ‘प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्मयुअर’ हाच मंत्र प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवे विलगीकरण नियम
लंडन : कोरोनाचा जबर तडाखा सोसलेल्या ब्रिटनमध्ये आता सामाजिक निर्बंध शिथिल करण्यात आले असून विलगीकरणाचे नवे नियम घोषित करण्यात आले आहेत. सागर तटांवर फिरण्यास केलेली बंदी उठविण्यात आली आहे. यामुळे असंख्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला. विदेशी प्रवाशांसाठी विलगीकरण कालावधी आता 14 दिवसांवर आणण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. . विदेशी प्रवाशांसाठी 14 दिवसांचे विलगीकरण राखण्यात आले आहे. मात्र, शिथिल नियमांमुळे पर्यटन व्यवसायाची झालेली हानी काही प्रमाणात भरून काढता येईल, असा विश्वास या देशातील विमान कंपन्यांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तयारी चालविली आहे.
सिंगापूरमध्ये निवडणूक
सिंगापूर : कोरोना संकटाची कृष्णछाया दिवसेंदिवस गडद होत असतानाही सिंगापूरमध्ये नवे सरकार निवडण्यासाठी मतदान पूर्ण झाले आहे. सर्व मतदारांना मास्कचा उपयोग करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच मतदान केंद्रांवर सामाजिक अंतर राखणे आणि थर्मल टेस्टिंग यासारखे उपाय करण्यात आले होते. मतदारांना मतदानासाठी विविध वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या.
बोलिव्हियाच्या अध्यक्षा बाधित
लंडन : दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशाच्या अंतरिम अध्यक्षा जेनी अनेझ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विरवरून दिली. 53 वर्षांच्या अनेझ यांची प्रकृती धोक्मयाबाहेर आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांच्यानंतर दक्षिण अमेरिकेतील देशाच्या कोरोनाने बाधित झालेल्या अनेझ या दुसऱया अध्यक्षा ठरल्या आहेत. व्हेनेझुएलाच्या घटना समितीचे अध्यक्ष डिओसडाडो काबेलो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
श्रीलंकेत समूह संसर्ग
कोलंबो : भारताच्या दक्षिणेला असणाऱया श्रीलंका देशात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाची घटना प्रथमच आढळून आली आहे. कोलंबो येथे एकाच वस्तीत राहणाऱया 250 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे चिंतीत झालेल्या प्रशासनाने लोकांना सामूहिक संसर्गापासून वाचण्यासाठी नियमांचे कठोररीतीने पालन करण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेत अंमलीपदार्थांचे व्यसन असणाऱयांना कोरोनाची बाधा अधिक प्रमाणात झाल्याचे आढळून आल्याने या पदार्थांच्या विक्रीवर कठोर निर्बंध घालण्याचा विचार सरकार करीत आहे. तीन हजार लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नेपाळ : कोरोनाचा नवा कहर
काठमांडू : जून महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणाऱया नेपाळमध्ये जुलैच्या प्रारंभापासून रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. गुरुवारी राजधानी काठमांडूमध्ये एकाच दिवशी 256 नवे रुग्ण आढळले आहेत. 3 जूनपासूनची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. देशाचे सरकार व पंतप्रधान ओली कोरोनाबाधितांची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या खुर्चीची काळजी अधिक करीत आहेत, असा आरोप नेपाळमधील काही विचारवंतांनी केला आहे. सध्या नेपाळमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,350 असून एकंदर मृत्यूसंख्या अवधी 11 इतकी आहे.