पहिल्या टप्प्यातील लसीकरणच अर्धवट : जिल्हय़ात सोमवारी आढळले 5 नवे रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना योद्धय़ांना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता तर दुसऱया टप्प्यातील लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. बेळगाव जिह्यातील स्थिती वेगळीच असून कोरोनावरील लस घेण्यास योद्धे अनुत्सुक असल्याचे सामोरे आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला उद्दिष्ट गाठता येईना, अशी स्थिती आहे.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, महसूल, महापालिका कर्मचारी आदी कोरोना योद्धय़ांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. 14 जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असला तरी सुरुवातीचा उत्साह आता दिसून येत नाही. आरोग्य विभागाने लस घेतली तरी पोलीस व महसूल खात्यातील कर्मचाऱयांना वारंवार मॅसेज पाठवूनही लस घेण्यासाठी ते उत्सुकता दाखवत नाहीत, अशी स्थिती आहे.
वातावरण निर्मिती तरीही…
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी लसीकरणासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. जिह्यातील वरि÷ अधिकाऱयांनी स्वतः लस घेऊन इतरांनाही लस घेता यावी, अशी वातावरण निर्मिती केली होती. तरीही अनेक जण लसीकरणासाठी पुढे येत नाहीत, अशी स्थिती आहे.
कोरोनावरील लस घेतल्यानंतर किमान 40 दिवस मद्यपान करू नये, असा सल्ला दिल्यामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे सामोरे आले आहे. पहिल्या टप्प्यातील मोहीम अर्धवट असतानाच आता दुसऱया टप्प्यातील लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. बेळगावात मात्र मुबलक लसींचा साठा असून कोरोना योद्धय़ांनी स्वयंप्रेरणेने लस घ्यावी यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, सोमवारी बेळगाव शहर व जिह्यातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिह्यातील एकूण रुग्णसंख्या 26 हजार 800 वर पोहोचली असून त्यापैकी 26 हजार 390 हून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 68 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 1 हजार 89 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.