कोणताही भेदभाव केला जाणार नाही : रशियाची भूमिका
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची भेदभाव न करता कोणत्याही देशाला ‘कोविड’वरील ‘स्पुटनिक-5’ ही लस देण्याची इच्छा असल्याचे या लसीच्या विकासात गुंतलेल्या ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’चे (आरडीआयएफ) मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव्ह यांनी सांगितले आहे. इतर देशांच्या भागिदारीतूनच आम्ही आपली लस तयार करू शकतो आणि आम्हाला कोणताही भेदभाव न करता कोणत्याही देशाला ती उपलब्ध करून द्यायची आहे, असे दिमित्रेव्ह यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय भागिदारांना सहकार्य करण्याच्या रशियाच्या इच्छेवर त्यांनी भर दिला आहे. ‘भागिदारी आणि सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सहकार्य करण्याची तयारी याबाबतीत रशियाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही ‘जीएव्हीआय’ आणि ‘सीईपीआय’ तसेच जागतिक आरोग्य संघटना आणि लस तयार करणाऱया तसेच त्यांच्या संशोधन व विकासात गुंतलेल्या सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर ठोस चर्चा करत आहोत, असे दिमित्रेव्ह यांनी म्हटले आहे.
रशियन कंपनीने यापूर्वी नमूद केल्यानुसार, रशियन लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमधील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, ‘एमआरएनए’ किंवा चिंपांझीतील ‘एडेनो व्हायरस’ वापरणाऱया लसींपेक्षा मानवी ‘एडेनो व्हायरल’ व्हेक्टर्स चांगला पर्याय ठरू शकतात. चिंपांझीतील ‘एडेनो व्हायरस’वर आधारित यासारख्या प्रायोगिक पद्धती लसीच्या विकासासाठी वापरण्याच्या धोक्मयांबाबत पाश्चात्य प्रसिद्धी माध्यमे का गप्प आहेत, असे दिमित्रेव्ह यांनी रशियन लसीविषयी घेतल्या जाणाऱया संशयाच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे. 11 ऑगस्ट रोजी रशियन आरोग्य मंत्रालयाने ‘स्पुटनिक-5’ची नोंदणी केली होती आणि ती जगातील कोविड-19 विरुद्धची प्रथम लस बनली होती.