वृत्तसंस्था/ उदयपूर
कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी आणि रोगप्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी उदयपूरमधील मदन मोहन मालवीय राजकीय आयुर्वेद महाविद्यालयातील विशेष तज्ञांनी आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली आहे.
आयुष मंत्रालयाने, कोविड- 19 संक्रमणापासून वाचण्यासाठी तुलसी, सुंठ, दालचिनी, काळी मिरची यापासून आयुष, हळदमिश्रित दूध, रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी अश्वगंधा सारख्या रसायन द्रव्यांचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली असल्याचे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य महेश दीक्षित यांनी सांगितले. यानुसार पहिल्या टप्प्यात तीन औषधांची 1500 किट वितरीत करण्यात आली आहेत. यामध्ये नवरसायन योग, माऊथ वॉश आणि नाकात टाकण्यासाठी ड्रॉप्सचा समावेश करण्यात आलेला आहे. ही औषधे महाविद्यालयात निःशुल्क उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.