बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना लसीकरण केलं जात आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण केले जात आहे. तर खासगीमध्ये लसीकरण करण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. पण खासगी रुग्णालयांमध्ये लसीच्या डोसचे दर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्डच्या एका डोसची किंमत खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये आणि भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या डोससाठी १२०० रुपये ठेवली आहे. तथापि, अनेक रुग्णालये कोविड लसीसाठी वेगवेगळे शुल्क आकारत आहेत. प्राप्त माहितीनुसार, एका हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डच्या एका डोसच्या किंमतीत ५० ते २०० रुपयांचा फरक आहे. अनेक खासगी रुग्णालये सेवा शुल्काच्या नावाखाली ५० ते ३०० रूपये शुल्क आकारात आहेत.
दरम्यान अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांना कोविड लसीची एकसमान किंमत ठरविण्याचा सल्ला खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनने (पीएचएएनए) दिला आहे.