बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी राज्यात कोरोना बाधितांची ८,२४४ नवीन प्रकरणे आढळली. त्या तुलनेत ८,८६५ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह, राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ३,६१,८२३ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४,६७,६८९ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी, ९८,४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात आता पर्यंत ७,३८४रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी यापैकी ११९ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. राज्यातील एकूण ८०० रूग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
गेल्या२४ तासांत राज्यात एकूण,४५,९६१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये १६,२९६ रॅपिड अँटीजेन्स आणि २९,६६५ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ३८,४६,९३७ रुग्णांची कोरोना चाचणी झाली आहे.