मार्केट रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालात माहिती
नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांचा कल हा स्वस्त स्मार्टफोन आणि टेलिव्हीजन खरेदी करण्यावर असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे देशभरातील विविध स्तरातील लोकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे प्रभावीत झाली असल्याचे पहावयास मिळत असल्याने ग्राहकही आपल्या आवडीनिवडी बदलण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे.
चालू वर्षात स्मार्टफोन्सच्या एकूण विक्रीमध्ये 10,000 रुपयापेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन्सची हिस्सेदारी ही जवळपास 54 टक्क्यांवर राहिली आहे. मागच्या वर्षी ही हिस्सेदारी 51 टक्क्यांवर राहिली होती. मार्केट रिसर्च फर्म आयडीसी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत स्मार्टफोन्सच्या एकूण विक्रीत स्वस्त मॉडेलचा हिस्सा हा वेगाने कमी झाला होता. मागील वर्षात एकूण विक्रीत स्वस्त स्मार्टफोनची हिस्सेदारी स्थिर राहिली.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्हीच्या एकूण विक्रीत 50 इंच आणि सर्वात मोठय़ा स्क्रीन असणाऱया टीव्हींची विक्री घटून 13 ते 14 टक्क्यांवर आली आहे. सहा महिन्या अगोदर ही स्थिती 17 ते 18 टक्क्यांवर राहिली होती. मागील एक वर्षात टीव्हींच्या किमतीत 50 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
स्वस्त उत्पादनास पसंती
सामान्य स्थितीत एकूण विक्रीत 10,000 रुपये मूल्य असणाऱया स्मार्टफोन्सची हिस्सेदारी ही 40 टक्क्यांवर राहिली आहे.