ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
संपूर्ण जगात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस देशातही मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये अवघ्या 14 महिन्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी त्याची प्रकृती खालावली व त्याने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, गुजरातमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले असले तरी मृतांचा आकडा काही कमी होत नाही आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजार पेक्षा जास्त असून आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाला आहे.