दैनिक तरुण भारत संवाद चा बार्शी तालुक्यात अजून एक दणका
प्रतिनिधी / बार्शी
वैराग येथील कोविड केअर सेंटर बाबत सोयीसुविधा आणि आणि तेथील गलथान कारभार याबाबत दैनिक तरुण भारत संवाद ने बातमी छापली होती. आज सोलापूर जिल्हा, बार्शी तालुका प्रशासन या बातमीमुळे खडबडून जागे झाले. आणि त्याविषयी आज प्रशासनाने निर्णय घेतला की येथील पॉझिटिव पेशंट बार्शीला हलवले आहेत, अशी बातमी दैनिक तरुण भारत संवाद ऑनलाइन ने प्रसिद्ध केले आहे. त्या ठिकाणी पाणी, निवास , जेवण इतर सुविधा पुरवल्या आहेत तसेच वैराग पोलीस ठाणे यांनी सुरक्षा वाढवली आहे. मात्र याबाबत अधिक माहिती घेतली असता आज आरोग्य विभागाने अधिकृत सांगितले की वैराग येथील पॉझिटिव पेशंट बार्शीला हलवल्यामुळे आणि बार्शी येथील पॉझिटिव्ह संख्या जास्त असल्याने त्यांची देखभाल करणे जिकिरीचे होत आहे.
त्यामुळे वैराग या ठिकाणी अजून एक शाळा फक्त कोरोना पोजिटिव्ह रुग्ण यांच्या साठी अधिग्रहित केली आहे. वैराग येथील अर्णव इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम स्कुल या शाळेच्या बारा खोल्या फक्त कोरणा पॉझिटिव साठी अधिग्रहित केली आहेत. अशी अधिकृत माहिती मिळाली आहे याबाबत आज तरुण भारत संवाद चे अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, आणि विविध संघटनाचे पदाधिकारी, नागरिक यांनी आभार मानले असून दैनिक तरुण भारत संवाद च्या बातमी आणि बातमीच्या परिणामावर होणारी कार्यवाही आणि कारवाई याबाबत कौतुक व्यक्त केला आहे.