शनिवारी सर्व 67 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हयातील सर्व 67 रुग्णांचे रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली. शुक्रवारी रात्री आठपासून ते शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केंम्पीपाटील यांनी दिली.
67 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हा आरोग्य प्रशासनाला शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 67 रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सर्व 67 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या शून्यावर आली.
54 स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी प्रयोगशाळेत
शुक्रवारी सायंकाळी 5 ते शनिवारी सकाळी 10 या वेळेत सीपीआरसह जिल्हयातील विविध हॉस्पिटलमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयित 485 रुग्णांचे स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली. यापैकी 54 संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या सीपीआरसह जिल्हयातील विविध रुग्णालयांमध्ये 230 कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
आजअखेर 422 कोरोना रुग्णांना डिसचार्ज
आजअखेर कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 659 वर पोहोचली आहे. तर 422 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करुन घरी पाठविण्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाला यश मिळाले आहे. कोरोनामुळे जिल्हयातील 7 जणांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्हयातील विविध रुग्णालयात 230 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
21 ते 50 वर्षे वयोगटातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह
जिल्हयात आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या 659 वर पोहोचली असून यामध्ये 21 ते 50 वर्षे वयोगटातील रुग्ण संख्या सर्वाधिक म्हणजेच 437 इतकी आहे. वर्ष व पॉझिटिव्ह रुग्ण संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे, 1 वर्षे – 1, 1 ते 10 वर्षे – 55, 11 ते 20 वर्षे – 82 वर्षे, 21 ते 50 वर्षे – 437, 51 ते 70 वर्षे – 81, 71 वर्षे