ता. पं. सदस्य किर्तने यांची ता. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे मागणी :
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाने देशात हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. अशा काळात आशा कार्यकर्त्या, पोलीस, सफाई कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, डॉक्टर व नर्स कोरोना योद्धे म्हणून स्वतःचा जीव धोक्मयात घालून कार्य करत आहेत. याची दखल घेऊन त्यांना महागाई भत्ता द्या, व नोकरीत कायमस्वरुपी करा, अशी मागणी ता. पं. सदस्य आप्पासाहेब किर्तने यांनी तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोना काळात दोन हात करणाऱया डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या या कोरोना योद्धय़ांचे कार्य उल्लेखनिय आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असून विषाणूचे संक्रमण वाढत आहे. या संकट काळात योद्धय़ांनी अहोरात्र अत्यावश्यक सेवा पुरवून आपले कर्तक्य बजावले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया या कोरोना योद्धय़ांना महागाई भत्ता व नोकरीत कायमस्वरुपी करा, अशा मागणीचे निवेदन ता. पं. सदस्य आप्पासाहेब किर्तने यांनी ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्याकडे सादर केले.