ऑनलाईन टीम / प्रेटोरिया :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेला पेरू हा देश कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 6 लाख 89 हजार 977 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 29 हजार 838 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पेरूमध्ये रविवारी 6 हजार 275 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 151 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 5 लाख 15 हजार 039 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 1 लाख 45 हजार 100 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1500 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका,भारत, ब्राझील आणि रशिया जगात आघाडीवर आहेत. त्यानंतर पेरूचा पाचवा नंबर लागतो.
अमेरिकेत 64 लाख 60 हजार 421 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 37 लाख 26 हजार 089 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर 1 लाख 93 हजार 253 रुग्ण दगावले. भारतात 42 लाख 8 हजार 645 रुग्ण आढळले. त्यामधील 34 लाख 50 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले. ब्राझीलमध्ये 41 लाख 37 हजार 606 जणांना कोरोनाची बाधा झाली. 33 लाख 17 हजार 227 रुग्ण बरे झाले.