एकूण आकडा झाला 2072 : बुधवारी तब्बल 348 नवे बाधित
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचे कालच्या दिवसात सर्वाधिक 348 नवे रुग्ण सापडले. काल बुधवारी 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2072 झाली आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 64 झाली आहे.
वास्कोतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 398 झाली आहे. कुठ्ठाळीत 292, मडगाव 136, तर फोडय़ातील रुग्णसंख्या 125 झाली आहे. चिंबलमधील रुग्णसंख्या 90, पणजीत 85, म्हापसा 68, डिचोली 12, सांखळी 63, पेडणे 36 तर वाळपईची रुग्णसंख्या 67 झाली आहे.
हळदोणाची रुग्णसंख्या 19, बेतकी 17, कांदोळी 55, कासारवर्णे 6, कोलवाळ 42, खोर्ली 43, शिवोली 16, पर्वरी 53, मये 8, कुडचडे 31, काणकोण 14, बाळ्ळी 53, कासावली 37, चिंचिणी 1, कुडतरी 52, लोटली 34, मडकई 28, केपे 37, सांगे 19, शिरोडा 41, धारबांदोडा 35 तर नावेलीची रुग्णसंख्या 46 झाली आहे. कोरोनामुळे काल 4 रुग्णांचा मृत्यू झाला.
- गोव्यात 5 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित 7423
- आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 5287
- उपचार घेणारे सक्रिय रुग्ण 2072
- 5 ऑगस्ट रोजीचे नवे रुग्ण 348
- 5 ऑगस्ट रोजी बरे झालेले रुग्ण 173
- 5 ऑगस्ट रोजी मृत्यू झालेले 4
- आतापर्यंतचे एकूण मृत्यू 64