ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. हा तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता.
त्याची तपासणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तरुणाला रग्णालयात डॉक्टरांच्या देखेरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हा व्हायरस आता जगात अनेक ठिकाणी पसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील 170 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.