-कोल्हापुरात राज्याबाहेरील तब्बल 2 हजार 841 रूग्णांवर उपचार, –जिल्ह्याबाहेरील 3 हजार 298 रूग्ण
विनोद सावंत / कोल्हापूर
शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रूग्णावर कोल्हापुरात उपचार दिला जातच आहे. विशेष म्हणजे देशातील तब्बल 17 राज्यातील कोरोना बाधितांवरही कोल्हापुरात उपचार होत आहे. आतापर्यंत राज्याबाहेरील 2 हजार 841 रूग्ण खासगी, सरकारी रूग्णालयात दाखल झाले आहेत. यासह परजिल्ह्यातील तब्बल 3 हजार 298 रूग्णांनी उपचारासाठी कोल्हापूरलाच प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधा चांगली असल्यामुळे येथे उपचाराला त्यांनी प्राधान्य दिल्याचे समजते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने संपूर्ण देशात कहर केला आहे. याला कोल्हापूरही अपवाद नाही. जिल्ह्यात रोज एक हजारहून अधिक नवीन रूग्ण आढळून येत आहेत. यामधील गंभीर रूग्ण खासगी, सरकारी रूग्णालयात दाखल होत आहे. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार सुरू आहेत. सध्या व्हेंटीलेटर बेड फुल्ल असले तरी ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. कोल्हापुरातील सरकारी तसेच खासगी रूग्णालयात तज्ञ डॉक्टर आहेत. अद्ययावत अशी खासगी रूग्णालय आहेत. त्यामुळे जिल्हÎाबाहेरील तसेच राज्याबाहेरून येथे उपचारासाठी येणाऱया कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.
कर्नाटकातील सर्वाधिक रूग्ण
कोरोनच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेमध्ये आतापर्यंत राज्याबाहेरल 2 हजार 841 रूग्ण कोल्हापुरात उपचारासाठी आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 2663 इतके रूग्ण शेजारील कर्नाटक राज्यातील आहेत. एकवेळी कोल्हापुरातील हर्टवरील रूग्णांसाठी शेजारील राज्यातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत होते. कोरोनामध्ये मात्र, हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.
सांगलीतून तब्बल 1078 रूग्ण कोल्हापुरात
सांगलीतील मिरजमध्ये हॉस्पिटलची संख्या सर्वाधिक आहे. नामवंत डॉक्टर आहेत. असे असतानाही सांगलीतील कोरोना बाधितांचा उपचारासाठी कोल्हापूरकडेच कल आहे. आतापर्यंत 1078 रूग्ण येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. याचबरोबर मुंबई 264, पुणे 317, सोलापूर 193, सिंधुदुर्ग 598, रत्नागिरी 308, सातारा 379, उस्मानाबाद 29, नागपूर 13, अहमदनगर 15, लातूर 11, रायगड 11, परभनी 13 रूग्ण कोल्हापुरातील रूग्णालयात दाखल आहेत.
बाहेरील रूग्णांचा विचार करून औषधांचे वाटप आवश्यक
राज्याबाहेरील तसेच पर जिल्हÎातील कोरोना बाधित कोल्हापुरात उपचारासाठी येत असले तरी राज्यशासनाकडून त्याप्रमाणत औषधे उपलब्ध होताना दिसून येत नाही. ऑक्सिजन पुरवठाही त्याप्रमाणात होणे आवश्यक आहे.
डेथ रेटचे प्रमाणावरही परिणाम
कोल्हापुराचा कोरोनाचा डेथ रेट देशात सर्वाधिक आहे. यामध्ये परजिल्हÎातील, राज्याबाहेरील रूग्ण येथे उपचारासाठी येत असल्याचेही कारण आहे. आतापर्यंत 429 जिल्हÎाबाहेरी कोरोना रूग्णांचा मृत्यू कोल्हापुरात झाल्याची नोंद आहे.
कोल्हापुरातील राज्याबाहेरील कोरोना रूग्णांची स्थिती
राज्य रूग्ण
कर्नाटक 2663
ओडीसा 4
झारखंड 4
राजस्थान 39
गुजरात 14
हैदराबाद 1
गोवा 8
हरियाना 1
आंध्र प्रदेश 11
मध्यप्रदेश 5
उत्तरप्रदेश 34
बिहार 37
बंगाल 8
तामिळनाडू 6
दमन 1
पंजाब 4
जम्मू काश्मिर 1