व्हनाळी / वार्ताहर
खेळामुळे शरीराबरोबरच मनही सदृढ होते. अशा व्हॅालीबॅाल सारख्या खेळाला अंतराष्ट्रीय कोच अजित पाटील यांनी बाचणी सारख्या खेड्यातून सातासमुद्रा पार नेले. त्यांनी केवळ खेळाडूच तयार केले नाहीत तर चांगली माणसंही घडवली असे प्रतिपादन पुणे जिल्हा न्यायाधिश साै. अश्विनी कदम यांनी केले.
बाचणी ता.कागल येथे आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल कोच अजित पाटील यांच्या गौरव समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्रकाशबापू पाटील (कराड) हे होते.
माझ्यासारखी खेळाडू देखील अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडली आणि जिल्हा न्यायाधिश म्हणून यशस्वी झाली असे कबुल करून न्यायाधीश सैा.कदम पुढे म्हणाल्या, अजित पाटील यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकाचा या परिसरातील खेड्यातील पालकांनी चांगला उपयोग करून घ्यावा आणि आपल्या मुलाचे भविष्य घडवावे. असे आवाहन त्यांनी केले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले प्रा. अजित पाटील यांचे हॉलीबॉल खेळातील योगदान अतुलनीय असून व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून त्यांनी बाचणी बरोबरच राज्यातील अनेक खेळाडू घडवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहेत. त्यामुळे आज अनेक खेळाडू शासकीय-निमशासकीय क्षेत्रांमध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत.
संजय घाटगे म्हणाले, अन्याय व खडतर परिश्रम हे जरी आमच्या वाट्याला आले असले तरी मार्ग काढण्याची ताकद व शक्ती कार्यकर्त्याच्या खंबीर पाठींब्यातून मिळाली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून अजित पाटील यांना प्रारंभीच्या काळात व्हॉलीबॉल खेळासाठी कुवतीप्रमाणे मदत केल्याचा आनंद आहे. अजित पाटील सारखा ग्रामीण भागातील व्हॉलीबॉल कोच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवतो व त्यांचे संसार उभा करतो हे त्यांचे योगदान उल्लेखनीय व इतरांना मार्गदर्शक आहे. बाचणी मैदानावरील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. मुलींना ही या खेळामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. याचा सार्थ अभिमान असल्याचे मा. संजयबाबा घाटगे यांनी भाषणात गौरव केला.
यावेळी अजित पाटील यांचा सपत्नीक सत्कार विजय डांगरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सन्मानपत्र समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते तर फोर व्हिलर गाडीच्या चाव्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते देण्यात आल्या. यावेळी आदर्श क्रिडा मडळाच्यावतीने गैारव म्हणून अजित पाटील यांना फोर व्हिलर गाडी भेट देण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना अजित पाटील म्हणाले, नोकरी ही पैसे मिळवण्यासाठी नाही तर खेळाडूं घडवण्या साठी केली. त्यातूनच गावाबरोबरच राज्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले. राज्य व राष्ट्रीय व्हॅालीबॅाल स्पर्धा बाचणीत भरवता आल्या, सध्या शेकडो खेळाडू नोकरीमध्ये उच्चपदस्थ म्हणुन कार्यरत आहेत.याचे मला समाधान आहे.
कार्यक्रमास पी .आर .भोसले, राजेंद्र मोहिते, एम.टी .देसाई,प्रा.अरुणा पाटील, राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील विराज पाटील, सुनील सूर्यवंशी, शाहूचे माजी संचालक आर .के .पाटील, निवासराव पाटील, इकबाल नायकवडी.एम.एस.पाटील. आदी मान्यवर व माजी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.स्वागत उत्तम पाटील यांनी केले तरआभार प्रा.ए्.आर.खामकर यांनी मानले