उचगाव / वार्ताहर
वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्यास गेलेल्या वायरमन शुभम देवेंद्र कांबळे वय 25 राहणार गणेश नगर उचगाव ता करवीर यास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नितीन पुंडलिक दाभाडे महालक्ष्मी कॉलनी उचगाव पूर्व याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी शुभम देवेंद्र कांबळे उचगावमध्ये महावितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करतात. ते नितीन पुंडलिक दाभाडे यांच्या घरी 5200 रुपये थकीत वीज बिलाची रक्कम वसुली करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी थकीत बिल भरण्यास सांगितले अन्यथा मला साहेबांच्या आदेशाने तुमचा वीजपुरवठा खंडित करावा लागेल असे सांगितले.
त्यावेळी संशयित आरोपी नितीन दाभाडे यांनी माझ्याकडे आत्ता विज बिल भरण्यास पैसे नाहीत असे म्हणत वायरमन कांबळे याना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.संशयित आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या कारणास्तव सरकारी कामात अडथळा आणले बाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल कदम करीत आहेत.